श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
शिक्षणाच्या माध्यमातून देश घडवा. तुम्ही भाग्यवान आहात की, तुम्हाला शिक्षणाचे सगळे दरवाजे आपल्या आसपास खुले आहेत. त्याचा उपयोग करुन जीवन उज्वल बनवा. देशभक्तीची सुरवात स्वतःच्या घरापासून करा, समाजामध्ये व घरामध्ये थोरांचा, आई-वडील व शिक्षकांचा सतत आदर करा. संविधानाचे महत्व जाणून विविधेतून एकता जपत रहा. शिस्त ही राष्ट्राची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत, त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत, नवनिर्मीतीचा ध्यास घ्यावा. असे मौलीक मार्गदर्शन श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी शिक्षण सभापती मा. नितीन कोकणे साहेब यांनी केले. पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाले. सदरचा कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष मा. रमेशचंद्रची बांगड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तर संस्थेचे संचालक दत्तात्रय म्हेत्रे, शिवाजी कारंडे, सौ. सुंदरा जोशी, गणेश माच्छरे, संदिप जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातवरणात पार पडला.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणे झाले. राष्ट्रगीत, ध्वजगीत झाले व संविधान झाले. प्रशालेतील एम.सी.सी. कॅडेट व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांना संचलनासह मानवंदना दिली. तंबाखू मुक्तीची शपथ जेष्ठ शिक्षक श्री. आर. ए. नाईकवाडे सर यांनी उपस्थितांकडून म्हणून घेतली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना आई आणि शिक्षक यांची तुमच्यासाठी असलेली तळमळ ओळखून चांगले शिक्षण घ्यावे, चांगला नागरिक बनावा. सध्याच्या काळात देशापुढे अनेक प्रकारचे ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीची चळवळ उभी करावी समाज व देशासमोर बेकारी, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा, लोकसंख्या वाढ शिक्षणाविषयीची अनास्था तसेच आरोग्याच्या वाढलेल्या समस्या इत्यादी प्रश्नांबाबत सदैव जागृत राहून त्यांचा निपटारा करण्याच्या दृष्टीकोनातून कार्य करत रहावे असे बहुमोल मार्गदर्शन केले.
कु. श्रावणी पसारे, गौरी मिरगणे व अनुज्ञा पाटील या विद्यार्थिनींच्या मनोगतानांतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रमेशचंद्रजी बांगड साहेब यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. डी. वाय. नारायणकर सर इत्यादी मान्यवर व पालक सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एस. व्ही पाटील मॅडम यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा