दूध उत्पादकांना फसविणार्या दूध संकलन केंद्रावर कारवाई करा : आंदोलन अंकुश
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील दुध संकलन केंद्रात वजन काट्यावर येणारे दुधाचे वजन हे उत्पादकांच्या वहीवर नोंदवले जात नाहीत तर त्यासोबत दूध उत्पादकांना फसविणारा दूध संकलन केंद्रावर कारवाई करा असे मागणीचे निवेदन आंदोलन अंकुश सघटनेने कोल्हापूर दुग्ध विकास अधिकारी प्रदीप मालगावे यांच्याकडे दिले आहे
आंदोलन अंकुश संघटना प्रमुख धनाजी चुडमुंगे, यांच्या नेतृत्वाखाली संघटना पदाधिकारी कोल्हापूर दूध विकास अधिकारी मालगावे यांची भेट घेतली त्यांच्यापुढे शिरोळ तालुक्यातील दूध संकलन केंद्रावरील सत्य परिस्थिती मांडले. प्रामुख्याने दूध वजनाचे नोंद वहीत केले जात नसल्याचां परिस्थिती काही केंद्रावर आहे त्या सोबत उदगाव मधील एका संकलन केंद्राचे बुक ही जोडण्यात आला आहे तसेच अनेक संकलन केंद्रात ऑटो मिल्क टेस्टरचा वापर न करता हॅन्डलच्या मशीनद्वारे फॅट काढले जाते. यामुळे दूध उत्पादकांना फसवले जात आहे. तर एकंदरीत या सर्वांचा गभिर्याने विचार करून
आपल्या विभागामार्फत अचानक दूध संकलन केंद्रानं भेटी देऊन तपासणी होऊन गैर कारभार करणाऱ्या दुध संकलन केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी अशी विनंती निवेदनद्वारे केली आहे. या निवेदनावर तालुका प्रमुख दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, बंडू होगले, संजय पाटील आदी च्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा