मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या भित्तीफलकाचे अनावरण

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोळच्या मार्गदर्शनाखाली "मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान" राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता शिक्षक,पालक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळाअभियान दि. ११ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर ४५ दिवस राबविणेत येणार आहे.विद्यार्थी केंद्रित उपक्रम व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी ४० गुण या पध्दतीने शाळांचे गुणांकन होणार आहे.यासाठी तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

         या अभियांनांतर्गत उपक्रमाचे फोटो व त्यासंबंधीचे वर्णन शाळांनी पोर्टल लॉगीन करुन पोर्टलवर सबमिट करावयाचे आहेत. या अभियानाची सुरुवात म्हणून आज पंचायत समिती शिरोळ येथील कक्षाचे व भित्तिफलकाचे अनावरण गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,नारायण पाटील,केंद्रीय प्रमुख दत्तात्रय जाधवर,अण्णा मुंडे,रियाज अहमद चौगले, सलीम आत्तार,मेघन देसाई,यशवंत पेठे, संदीप कांबळे,सुरेश कोळी,प्रकाश खोत,शरद सुतार, एन.जे.पाटील,साबीर पटेल, उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष