माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाच्या निरीक्षणात घोटाळा : मुख्याध्यापक डॉ.देवेंद्र कांबळे

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

      महाराष्ट्र राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या "माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाचा शिरोळ तालुक्यातील सर्व्हेमध्ये निरीक्षकांनी पथकतीलच करभाऱ्यांच्या शाळेला क्रमांक देत या स्पर्धेच्या हेतूला काळिमा फासल्याचा आरोप अब्दुललाट ता. शिरोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ.देवेंद्र कांबळे यांनी करत स्पर्धेचे विशेष पथकामार्फत फेर सर्व्हेशन करून निरीक्षणात घोटाळा करणाऱ्या निरीक्षकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. 

         दरम्यान अब्दुललाट हायस्कुलचा दोनवेळा सर्व्हे करण्यात आला.पहिल्या सर्व्हेत 60गुण मिळाले याबाबत शंका उपस्थित केली असता फेर सर्व्हे करण्यात आला.त्यावेळी 19 गुण वाढले कसे?असा सवाल उपस्थित करत निरीक्षकांनी सोयीस्कर गोंधळ आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे डॉ.कांबळे यांनी सांगितले.

       पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मुख्याध्यापक डॉ.कांबळे म्हणाले निरीक्षकांनी निकष पूर्ण करू शकत नसलेल्या शाळांना 80 ते 92 पर्यंत गुणांकन देऊन केंद्रात नंबर आणून तालुक्यात प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांक दिला आहे.आणि ज्या शाळांनी जीवाचे रान करून या अभियानात आपली शाळा यशस्वी व्हावी यासाठी घेतलेले परिश्रम पाहता त्यांना दिलेल्या गुणात आणि निकषात तफावत आहे.सर्व्हेशनात पात्र ठरत असताना त्यांच्या गुणात कमतरता दाखवून त्या शाळांच्यावर अन्याय केला आहे. निरीक्षकांच्या कडून झालेला हा प्रकार निदंनीय आहे. 

        असे सांगत डॉ.कांबळे पुढे म्हणाले या अभियानाचा विशेष पथकामार्फत फेर सर्व्हे केल्यास निरीक्षकांनी केलेल्या सोयीस्कर सर्व्हेचा पर्दाफाश होईल आणि निकषपूर्ण असणाऱ्या पात्र शाळांचा सन्मान होईल.त्यासाठी फेर सर्व्हे करावा,निरीक्षकांनी जो सर्व्हे केला आहे.त्या सर्व्हेचा दप्तर जप्त करावा.यामध्ये दोषी आढळणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करावी.अन्यथा आम्हाला आंदोलनाचे शास्त्र उपसावे लागेल.असा इशारा दिला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष