चिंचवाड उपसरपंचपदी बाबासो चौगुले बिनविरोध



उदगाव / शिवार न्यूज नेटवर्क :

चिंचवाड ता. .शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाबासो आण्णासो चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच जालिंदर ठोमके होते. निवड निरीक्षक ग्रामविकास अधिकारी मोहन पाटील होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वैभव गोधडे यांनी केले. चिंचवाड ग्रामपंचायतचे उपसरपंच पद रिक्त होते. निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी बाबासाहेब चौगुले यांच्या व्यतिरिक्त कोणतेही अर्ज दाखल न झालेने त्याची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अजित चौगुले, आणासो ककडे, सुदर्शन ककडे, बबन चव्हाण, दादासो गोधडे, प्रमोद ककडे, सुरेश चौगुले, कुमार मिरजे, मुरली पाटोळे, कुमार मगदुम, महावीर ककडे, परमानंद उदगांवे, विठठल घाटगे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संजय चौगुले यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष