शिरोळमध्ये २० व २१ रोजी शिवस्फूर्ती व्याख्यानमाला
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास व आदर्श विचारांची माहिती व्हावी यासाठी शिरोळ शहर व परिसरातील शाळा महाविद्यालयांमध्ये शिवस्फूर्ती व्याख्यानमाला मंगळवार दिनांक २० व बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
व्हिजन आयडॉल करिअर अकॅडमी राधा सोशल फौडेंशन शिवम आध्यात्मिक व सामाजिक सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास व विचारांचा जागर करण्यासाठी शिवस्फूर्ती व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता येथील पद्माराजे विद्यालयात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांचे छत्रपती शिवरायांचे चरित्र या विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच दुपारी ३ वाजता केंद्रीय मराठी शाळा व कन्या विद्या मंदिर दत्तनगर येथे ॲड उदय मोरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे यावेळी विविध मान्यवर आणि विद्यार्थी शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिव प्रतिष्ठानचे शिरोळ तालुका अध्यक्ष प्रवीण चुडमुंगे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य याविषयी व्याख्यान होणार आहे तर दुपारी ३ वाजता न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर येथे शिवम माळकर व प्रज्ञा माळकर यांचे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा