आंबेडकरवादी सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली शरदचंद्रजी पवार यांची भेट
सुनिल दावणे / शिवार न्युज नेटवर्क
जेष्ठ पुरोगामी विचारसरणीचे कामगार नेते काॅम्रेड गोविंदराव पानसरे* यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापूर येथे काॅम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार शरदचंद्रजी पवार हे कोल्हापूर येथे आले असता आंबेडकरवादी सेनेच्या* वतीने कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांचे न्यू पॅलेस या ठिकाणी भेट घेवून विविध सामाजिक राजकीय तसेच लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी आपण जो लढा उभा केला आहे. या संघर्षमय चळवळीला पाठिंबा तसेच पुरोगामी विचारसरणी महाराष्ट्रातून हद्दपार होत असताना आपण घेतलेली परिवर्तनवादी भूमिका हि देश हिताची आहे असे प्रतिपादन आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास हुपरीकर यांनी केले तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार राजीवजी आवळे, आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास हुपरीकर,कामगार नेते भिमराव जामकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेश कांबळे, किणीचे अमर धनवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश महापुरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा