शिरढोण -कुरुदवाड रस्त्यावर ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण -कुरूदवाड रस्ता लगत वृंदावन हॉटेल नजीक चौधरी यांच्या शेताजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.ऊस वाहतुक करताना ट्रॅक्टर चालकाच्या बेफिकिरीने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्याने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या ऊसाचे अतोनात नुकसान होत आहे. फडात ट्रॅक्टर ट्रॉली ऊसाने भरताना काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येते आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा