कुमार विद्या मंदिर घालवाड शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कुमार विद्यामंदिर घालवाड शाळेत दि.२८फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी शाळास्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यातआले.या विज्ञान प्रदर्शनात कुमार विद्यामंदिर घालवाड शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले.विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घालवाड गावचे सरपंच सुहास खाडे होते. कार्यक्रमासाठी उपसरपंच विनोद गायकवाड,हसुर केंद्राचे केंद्रप्रमुख मुंडे,ग्रा.पं.सदस्य अभिलाष कांबळे,माजी सरपंच कृष्णदेव इंगळे,कुमार घालवाड शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी कोळी,कुमार घालवाड शाळेचे अध्यक्ष शरद खाडे,उपाध्यक्षा अनिता परीट,सदस्य सागर जाधव व सर्व सदस्य कन्या घालवाड शाळेच्या अध्यक्षा कविता फडतारे, उपाध्यक्ष नामदेव पाटील, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कुमार व कन्या घालवाड शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, घालवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ,पालक उपस्थित होते. कुमार व कन्या विद्यामंदिर घालवाड शाळेचे विद्यार्थी,घालवाड हायस्कुचे विद्यार्थी ,पालक, ग्रामस्थ यांनी या प्रदर्शनास भेट देऊन मुलांचे प्रयोग पाहुन प्रोत्साहन दिले व कौतुक केले.या विज्ञान प्रदर्शनात एकूण ५८ प्रयोगाची मुलांनी मांडणी केली होती.या कार्यक्रमासाठी कुमार घालवाड शाळेचे विज्ञान विभाग प्रमुख साळुंखे यांनी परिश्रम घेतले तसेच सौ,चव्हाण,श्री.माकणे,श्री हंकारे,सिरसाट यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कुमार विद्यामंदिर घालवाड शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी कोळी यांनी केले.सरपंच व इतर मान्यवरांनी शाळा व शिक्षक यांचे कार्यक्रम आयोजनाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल सिरसाट यांनी केले तर लक्ष्मीकांत हंकारे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा