शिरोळ येथे श्री संत रोहिदास जयंती उत्साहात

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील श्री संत रोहिदास मंडळ व समस्त चर्मकार समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील वन - वे मार्गावरील श्री संत रोहिदासनगर येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

         येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक निशिकांत प्रचंडराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ दगडू माने यांनी स्वागत केले. शशिकांत राजमाने यांनी प्रास्ताविक केले .

     भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद अशोकराव माने , शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांतराव प्रचंडराव , माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील , शिरोळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने,माजी सरपंच गजानन संकपाळ ,गोरखनाथ माने , रावसाहेब पाटील -मलिकवाडे यांच्यासह मान्यवर तसेच चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

       जयंतीनिमित्त दुपारी माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महिलांचा हळदीकुंकू तसेच होम मिनिस्टर हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . 

   यावेळी अनिता संकपाळ ,सारिका माने , इंद्रायणी पाटील , डॉ नीता माने , शुभांगी फल्ले यांच्यासह महिला पोलीस एस एस गायकवाड तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष