शिव कामगार सेना उपजिल्हाप्रमुख पदी जितेंद्र ठोंबरे


 

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

जितेंद्र ठोंबरे यांची शिव कामगार सेना उपजिल्हा प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र त्यांना राज्य अध्यक्ष सुधीर कुरुमकर यांनी दिले.

जितेंद्र ठोंबरे यांनी आपल्या सामाजिक कार्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील वंचित घटकांना मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची 'शिव कामगार सेना उपजिल्हा प्रमुख कोल्हापुर जिल्हा" या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिव कामगार सेना, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातुन समाजातील विविध क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगार घटकांचे प्रश्न लोकशाही पध्दतीने सोडविण्याचे व शिव कामगार सेनेची विचारधारा व कार्यपध्दत यशस्वीपणे पार पाडून संघटनेच्या नियम व अटी मान्य करुन व वेळोवेळी कार्यरत असताना वरिष्ठांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष