मराठा वॉरियर्स ग्रुप तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क :
मागील सतरा वर्षापासून या मंडळांने सैनिक टाकळीमध्ये पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे. सामाजिक बांधिलकी, प्रबोधन, गरजूंना मदत ही या ग्रुपची दरवर्षी संकल्पना असते. यावर्षी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी या ग्रुपच्या माध्यमातून कुमार व कन्या विद्या मंदिर तसेच छत्रपती संभाजीनगर शाळेमध्ये लहान मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा तसेच सायंकाळी चार वाजता मुला व मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा या मंडळातर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या. १९ तारखेला सकाळी सात वाजता पन्हाळगडाहून शिवज्योतीचे आगमन झाले. या मंडळातर्फे करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर स्वच्छता, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई यांनी सारा परिसर सुंदर दिसत होता.
त्यानंतर या मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे १९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मंडळाच्या वतीने गावातील सर्व ग्रामस्थांसाठी, कोणत्याही प्रकारची शरीरातील व्याधी यावरती मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.
सकाळी ११ वाजता या मंडळाच्या वतीने प्रत्येक घरामध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी घरोघरी शिवप्रतिमा पूजन व सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. दुपारी बारा वाजता शिवजन्म सहकार व महाप्रसादाचे आयोजन या मंडळांने केले होते.
सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी हायस्कूल येथून शिवजयंती मिरवणूक ढोल ताशा, झांज पथक ,घोडे ,लेझीम धनगर ढोल अशा पारंपारिक वाद्यासह मार्गस्थ झाली. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे केल्या सतरा वर्षापासून या मंडळांने सामाजिक बांधिलकी राखून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व शिवजयंती कोणतेही गालबोट न लावता आजपर्यंत साजरी केली आहे म्हणूनच संपूर्ण संपूर्ण सैनिक टाकळी तसेच परिसरामध्ये या मित्र परिवाराचे मोठे कौतुक होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा