कोल्हापूर जिल्हातील दुध संघाने सीमाभागातील दुध उत्पादकांना महाराष्ट्र प्रमाणे दर द्यावा : आमदार शशिकला जोल्ले

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असलेली जनता व्यवसायाने एकमेकांशी सतत निगडित आहेत.कर्नाटक सीमाभागातील बहूसंख्य दूध उत्पादक दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापूर जिल्हातील दूध संघांना दूध पुरवठा करत आले आहेत. आता ही मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा केला जात आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वच दूध उत्पादकाना कायम पणे समसमान दर देण्याची परंपरा कायम पणे चालत आली आहे. असे असताना कोणतेही कारण नसताना कर्नाटक सीमा भागातील गाई व म्हैस दूध दर कमी केला आहे हा म्हणजे सीमा भागातील दूध उत्पादकांवर अन्याय आहे या साठी महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध दरात दुजाभाव न करता सर समान दर द्यावा, असे अवाहन खासदार श्री. अण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी महाराष्ट्रातील दूध संघांना केले आहे.

     कोल्हापूर जिल्हातील दूध खरेदी- विक्री संघांनी अचानकपणे आदेश काढून कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्राबाहेरील म्हैशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपये आणि गाई च्या दरात प्रति लिटर साडेचार रुपये कपात केली आहे. यामुळे कर्नाटक सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कर्नाटकच्या सीमाभागातील उत्पादन होणारे दूध गेले अनेक वर्षा पासून कोल्हापूर जिल्हातील गोकुळ, दत्त इंडिया, भारत डेअरी, विमल डेअरी इत्यादि डेअरीना दूध विक्री करतात. कोल्हापूर जिल्हाचे शेतकऱ्यांबरोबर दर मिळवीत होते. पण आताच्या आदेशामुळे सीमाभागातील दूध उत्पादक बाबत दुजाभाव निर्माण केला आहे.

       ज्याप्रमाणे कोल्हापूर व सांगली जिल्हातील साखर कारखाने आपल्या भागातील शेतकऱ्या प्रमाणे सीमाभागातील खरेदी केलेल्या शेतकऱ्याच्या ऊसास योग्य व समान दर देत आहेत. तर मग त्याच शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेले दूध दरात तफावत कशासाठी...? दूध संघाचा या दुटप्पी धोरणामुळे सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्या बरोबरच शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव होत आहे. तरी कोल्हापूर जिल्हातील दूध खरेदी-विक्री संघांनी आपला अन्यायकारक आदेश मागे घ्यावा असे अहवान चिक्कोडीचे माननीय खासदार श्री. अण्णासाहेब जोल्ले व निपाणीच्या आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष