शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी ग्राहकांचा अधिकार, हक्क, कर्तव्यांची माहिती घेणे गरजेचे : डॉ. कुमार पाटील

 


हैदर‌अली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

ग्राहक हा राजा असून ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायदा अन्वये हक्क अधिकार आणि कर्तव्य बहाल करण्यात आली आहेत. शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी याची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन साहित्यिक व व्याख्याते डॉ. कुमार पाटील यांनी व्यक्त केले. भारतीय ग्राहक पंचायत संघटन सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन पीएमश्री पुरस्कार प्राप्त आदर्श प्रशाला कै शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्यामंदिर नांदणी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार रामगोंडा पाटील व तालुकाध्यक्ष श्री राजेश शंभूशेटे उपस्थित होते. ग्राहक प्रबोधन व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले. डॉ कुमार पाटील यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांचे योगदान, ग्राहक संरक्षण कायदा, हक्क, अधिकार कर्तव्य, ग्राहक संरक्षण परिषद याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना आहार, विहार, संस्कारचे धडे दिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुकाध्यक्ष श्री राजेश शेटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ग्राहक चळवळीचे महत्त्व विशद केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रशालेस ग्राहकबिंदू हा सुवर्ण महोत्सवी विशेषांक भेट देण्यात आला. यावेळी कन्या विद्या मंदिर चे प्र. मुख्याध्यापक श्री कोडोले सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री लठ्ठे सर व इतर शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष