दुधगंगा वेदगंगा नदीला आले पाणी, शेतकरी समाधानी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

काळम्मावाडी धरणातील कर्नाटक हिस्याचे शिल्लक राहिलेले २ टि.एम.सी पाणी दुधगंगा वेदगंगा नदीला ३१ मे पर्यंत सोडण्यात येणार आहे. सध्याचे १.११ टि.एम.सी पाणी दुधगंगा वेदगंगा नदीला आले असून शेतकरी समाधानी झाला आहे.

 कर्नाटक महाराष्ट्र पाणी वाटप करार नुसार काळम्मावाडी धरणातील ४.६० एमसीएफटी म्हणजेच ३.११टिएमसी पाणी कर्नाटक प्रदेशासाठी निर्धारित करण्यात आले आहे. वर्षाच्या काही महिन्यांत हे पाणी दुधगंगा व वेदगंगा नदीला सोडले जाते. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत १.११ टिएमसी म्हणजेच २००एमसीएफटी पाणी काळम्मावाडी धरणातून दुधगंगा वेदगंगा नदीला सोडण्यात आले आहे. उर्वरित २६० एमसीएफटीचे २ टिएमसी पाणी हे मार्च ,एप्रिल ,में ३१ पर्यंत सोडण्यात येणार आहे.काळम्मवाडी धरणातील गळतीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नदीला पाणी येणार नाही याची धास्ती शेतकरी व नागरीकांनी घेतली होती पण गळतीचे काम सुरू असले तरीही 

पाणी करारानुसार नदीला पाणी येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात केवळ आठच दिवस पाऊस झाल्याने विहिरी व बोअरचे पाणी पातळी घटली आहे . पिके वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.त्यामुळे शेतकरी व नागरिकानी पाण्याचा उपद्रव टाळुन पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. 

   यंदा पाऊस कमी झाल्याने व काळम्मावाडी धरणातील गळतीचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत असले तरी देखील कर्नाटक हिस्याचे पाणी सोडण्यात येत आहे. करार नुसार में महिन्या पर्यंत पाणी दुधगंगा वेदगंगा नदीला सोडले जाणार आहे.गळीतीची समस्या उद्भवल्यास कोणत्याही क्षणी पाणी कपात केली जावू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई भासू नये यासाठीही विशेष खबरदारी घेतली जात आहे . २ टिएमसी पाणी अद्याप शिल्लक असुन में पर्यंत नदीला सोडले जाणार आहे.

- आप्पासाहेब पुजारी (सहाय्यक अभियंते पाटबंधारे विभाग निपाणी) 

 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष