मोटरसायकल चोरट्याला कुरुंदवाड पोलिसांनी केले जेरबंद
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
आठ दिवसांपूर्वी शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याला कुरुंदवाड पोलिसांनी अत्यंत शिताफीने धुळे जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेली दोन लाखांची केटीएम ड्यूग मोटारसायकल जप्त केली आहे.
याप्रकरणी दीपक हिरालाल पावरा (वय २०, रा. विखरण, ता. शिरपूर, जि. धुळे) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विशाल विजय मटाले (रा. दत्त कॉलेज रोड, कुरुंदवाड) यांनी पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मटाले यांच्या मालकीची अंगणात पार्किंग केलेली केटीएम ड्यूग कंपनीची मोटारसायकल क्र. (MH 09 FR ८१८९) अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची फिर्याद मंगळवार (दि. २०) रोजी दिली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिसला नसल्याने याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी अत्यंत शिताफीने चोरट्याला शोधून काढण्यात यशस्वी ठरले.
हा आरोपी धुळे जिल्ह्यातील असून त्याच्याकडे चोरीची गाडी असल्याची खात्री होताच येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने रविवारी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेऊन मोटारसायकल जप्त केली.ही कारवाई सागर खाडे, नागेश केरीपाळे, विवेक कराडे, फारुख जमादार यांनी केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा