अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी व्याख्याने संपन्न

 


हैदर‌अली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन नंदादीप शिक्षण प्रसारक मंडळ नांदणीच्या ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष श्री राजेश शंभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी ग्राहक प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन सुरू आहे. त्या अंतर्गत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक; वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार रामगोंडा पाटील* यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सजग होऊन ग्राहकांच्या हक्क अधिकार कर्तव्यांची माहिती घेऊन आपल्या पालकांना जाणीव करून द्यावी. विद्यार्थ्यांनी योग्य आहार विहारासह सुसंस्कारित होऊन देशाचे सुदृढ आधारस्तंभ बनाने असे आवाहन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ पी पी देसाई यांनीही मनोगत व्यक्त करुन  अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष श्री राजेश शंभूशेट्टे यांनी शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक चळवळ गरजेची असुन सर्वांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा अभ्यास करुन होणारी फसवणुक टाळावी असे विचार व्यक्त केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सुवर्णमहोत्सवी ग्राहकबिंदू हा विशेषांक प्रशालेस भेट देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी जैनापुरे सर यांनी केले तर कार्यक्रमाची नियोजन व संयोजन श्री एस ए गरड सर यांनी केले. याप्रसंगी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी  मोठया संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष