औरवाड येथे वाळू तस्करीचा महसूल विभागाने केला पर्दाफाश

 



नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

औरवाड पाणवठ्यारून गावातील युवकांकडून रात्री उत्खनन केलेली अंदाजे 12 ते 13 ब्रास वाळू महसूल विभागाने जप्त करून तहसील कार्यालयात जमा केली.या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्या मध्ये भिती पसरली असून महसूल पथकाने आठवड्यात दुसर्यांदा कारवाई केलेने महसूलचे विभागाचे कौतुक होत आहे.

     कृष्णा नदीच्या पाणी पातळीत थोडी कमी झालेचा फायदा घेऊन अज्ञात लोकांकडून रात्री 12 नंतर पाण्यात बुडुन वाळू उपसा केला जात आहे,याबाबतची माहिती शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळताच त्यांनी नृसिंहवाडी मंडळ आधिकारी अमितकुमार पाडळकर व औरवाडचे अतिरिक्त चार्ज असलेले तलाठी सदाशिव निकम यांच्या पथकाने पहाटे पाच वाजलेपासून चोरून उत्कनं केलेली अंदाजे 12 ते 13 ब्रास वाळू जप्त करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तहसील कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आली,सदरच्या कारवाई पथकामध्ये नृसिंह वाडी मंडळ आधिकारी अमितकुमार पाडळकर,तलाठी सदाशिव निकम,सुरेश भानुसे, कोतवाल शिवाजी गंगाधर,महेश शेडबाळे यांचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष