ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. शिरोळ शहराध्यक्षपदी शमा खलिफ


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या शिरोळ शहराध्यक्ष पदी सौ.शमा राजू खलिफ यांची निवड करण्यात आली.  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एम.जी.बागवान व शिरोळ तालुका अध्यक्षा रेश्मा चिल्लू यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आले. सौ.शमा राजू खलिफ यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.यांच्या निवडीने ओबीसी संघटनेच्या कार्याला चालना मिळेल तसेच समाजाचे प्रश्न मिटविण्यास मदत होईल.अशी आशा व्यक्त केली जात आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील,शेखर पाटील,अॅड. प्रमोद पाटील,अब्दुल खलिफ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष