खणदाळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार राजेश पाटील

 


 सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ गावच्या सर्वांगीन विकासासाठी भरीव निधी मिळावा यासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच व ग्रामस्थांनी मिळून आमदारांना निवेदन देण्यात आले. शालेय शिक्षण व क्रिडा क्षेत्रात नाव असलेल्या व हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेले हे गाव. या गावचे सर्वांगीण विकास व्हावा म्हणून गावांतर्गत रस्ता काँक्रीटकरण,गटारे, सांस्कृतिक भवन , तलाव (क्यरीकडील ) रस्ता, इतर कामांचाही निवेदन देण्यात आले तलाव ( क्यरीकडील) रस्ता हा लोकांची वसाहत व शेताकडे जाणारा रस्ता असल्याने हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून मिळावे व इतर कामांचाही निवेदन देण्यात आले. आमदार राजेश पाटील यांनी ते काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गावचे सरपंच रवी यरकदावर, जयसिंगराव चव्हान, जयकुमार मुन्नोळी, पदाधिकारी व खणदाळ गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष