फसवणूक प्रकरणी चौघांना अटक ; चार दिवसाची कोठडी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील धनश्री स्वप्निल देशींगकर यांना ब्युटी अण्ड कॉस्मटीक प्रोडक्ट कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून वर्क फ्रॉम होम व्यवसाय करीत असताना खोटे सांगून देशींगकर यांच्याकडून २४ लाख ५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणाविरोधात १८ ऑक्टोबर २०२२ मध्ये शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यातील चौघांना शिरोळ पोलिसांनी अटक करून मंगळवारी जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
यात राजेंद्र प्रल्हाद पाटील (वय 22 रा.मुळ मोंडाळे ता.पारोळा जि.जळगांव सध्या रा.शिक्रापूर पुणे), लखन दादा मंडलिक (वय २५ रा. उल्हासनगर ब्राम्हणपाडा तुळजाभवानी चाळ ठाणे), गणेश तुका जाधव (वय २५ रा. थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे) व अनिल सुभाष माळी (वय २६ रा थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे) यांना मंगळवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असताना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तीवाद केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा