चिकोडी येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या मराठा समाज सेवा संघ होस्पेट गल्ली चिकोडी येथे आज शिवरायांची जयंती रक्तदान शिबिर ,मर्दानी खेळ, शालेय विद्यार्थी प्रश्नमंजुषा, नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, अशा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी शिवाई महिला मंडळ होस्पेट गल्ली चिकोडी यांच्यामार्फत शिवराय जन्म सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पाळणा गीते, शिवरायांची आरती, शिवभक्तीपर गीते इत्यादी कार्यक्रम सादर करण्यात आले.
शिवप्रतिमा पूजनाचा कार्यक्रम मान्यवर सन्माननीय श्री अनिल माने (नगरसेवक चिकोडी) श्रीमंत श्री मोहनसिंग निंबाळकर ,श्रीमंत श्री अनिलसिंह निंबाळकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सदलगा शहरातील जेष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, प्राध्यापक मोरे सर. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
आजच्या समाजामध्ये शिवरायांच्या आदर्श व उदात्त विचारांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, आणि सुदृढ व सुजान समाज निर्माण करण्यासाठी शिवरायांचे विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे. असे विचार प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी आपल्या भाषणात मांडले.
यावेळी मराठा समाज सेवा संघ होस्पेट गल्ली यांच्यामार्फत उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिलजी माने ,श्रीमंत अनिलसिंहजी निंबाळकर, श्रीमंत श्री मोहनसिंगजी निंबाळकर ,प्रमुख अतिथी श्री अण्णासाहेब कदम,श्री मोरे सर या मान्यवरांचा मंडळातील कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मंडळाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 55 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून *रक्त दान हे श्रेष्ठ दान* आहे याची प्रचिती शिवजयंती दिनी सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर ठेवली. याप्रसंगी रमेश लोकरे आणि समूह यांच्याकडून मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी संजय शिंदे, संकेत फोटोचे मालक प्रकाश घोरपडे, शंकर चव्हाण ,विजय जाधव, किरण घाटगे, महादेव भोपळे, नारायण लकडे, अमित लकडे, अजित नेजकर, वसंत यादव, अरुण लकडे, गजू पवार ,आनंद शिंदे सागर भोसले कुणाल शिंदे, पिंटू यादव ,अजय पटवेगार, प्रदीप जोंधळे, मैदानी खेळाचे कलाकार रमेश लोकरे, विठ्ठल पानगावे ,शुभम चव्हाण, राहुल लोकरे , रंजीत चव्हाण, सांस्कृतिक मंडळाचे अजय शिंदे, शिवाई मंडळाच्या अध्यक्षा सौ. वंदना भोसले .इत्यादी कार्यकर्त्यांसह अनेक शिवप्रेमी व शिवभक्त कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एन घाटगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ वंदना भोसले यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा