ढोणेवाडीत दि .२४ फेब्रुवारी रोजी वसंत हंकारे यांचे व्याख्यान
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
ढोणेवाडी ता.निपाणी येथील आई फाऊंडेशन, यांच्या वतीने सन २०२३-२४ सालातील सरकारी हायस्कूल इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ निमित्ताने अखंड कर्नाटक- महाराष्ट्रभर नव्हे तर देशात ज्यांच्या व्याख्यान्याने सर्वांना वेड लावणारे राष्ट्रीय वक्ते वसंत हंकारे यांचे" बाप समजून घेताना व चला जगुया आनंदाने..".. या विषयावर जाहीर व्याख्यान सांयकाळी ७ वाजता चावडी चौकात आयोजित करण्यात आले आहे.यानिमिताने गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने वहिनी आहेत.
या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन शिक्षण प्रेमी, एस.एम. माळी सर, , चिमासो नाडगे, व, प्रकाश सादळकर यांच्या हस्ते तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन,सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक,विजयकुमार गौराई , सखाराम नागराळे , सरकारी हायस्कूल एसडीएमसीचे अध्यक्ष राजू माळी, यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी विविध क्षेत्रात निवड झालेले विद्यार्थी, निवृत्त सैनिक व शिक्षक, व गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास,माजी अध्यक्ष तुकाराम माळी, ग्रा. पं. उपाध्यक्षा नंदिनी कांबळे,माजी ग्रा.पं. अध्यक्षा संपदा जाधव, सदस्य संतोष हिरीकुडे ,सुरेखा पाटील - बाबासाहेब खोत. स्नेहा घाटगे , शिवाजी नागराळे कस्तुरी दुगाणे ,दादासो सुतार,अश्विनी पाटील संजय सौंदलगे ,तायव्वा बारवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक आई फाऊंडेशन ढोणेवाडी ता.निपाणी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा