आगामी 10 वी व 12 वीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॅप्टर व विमान प्रवास : सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचा उपक्रम
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतं या प्रामाणिक हेतूने गेल्या अनेक वर्षापासून येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी भारतरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतात. शिका ,संघटित व्हा ,व संघर्ष करा हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन त्यांनी करीत असलेले कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे यासाठी यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंती निमित्त बोरगांव अंतर्गत येथील 10 वी व 12 वी परीक्षांमध्ये 95% च्या पुढे गुण मिळवलेल्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे.
याबाबत आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे म्हणाले, आपल्या समाजात शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी व समाजात शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मी माझ्या हातून शैक्षणिक काम करीत आहे. बौद्ध समाजातील विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावे व त्यांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी आपण यावर्षीच्या 10 वी व 12 वी परीक्षा मध्ये 95% च्या पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास तसेच त्यांचा सन्मान व सत्कार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे .यासाठी मला समाजातील सर्वांचे सहकार्य मिळत आहे. आमच्या बौद्ध समाजातील 10 वी व 12 वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे त्यांनी सांगितले.
तुषार कांबळे यांनी आजवर अनेक सामजिक उपक्रम राबविले आहेत.त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे उपस्थीत मान्यवरांनी व्यक्त केले. या पत्रकार बैठकीस नगर सेवक अमर शिंगे ,राजू शिंगे,डॉ.अभिजीत शिंगे , नितीन कुरळे , राकेश शिंगे, शांतिनाथ पीरकाने,भरत कांबळे, अशोक दुर्गमर्गे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा