खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून शिरोळात 2 कोटी 20 लाख रुपयाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजना व नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून शिरोळ शहरातील विविध विकास कामांसाठी 2 कोटी 20 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता या सर्व विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी खासदार धैर्यशील माने यांच्यासह मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला .
खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निधीतून शहरातील अनेक प्रभागांमधील रखडलेली विकास कामे पूर्ण होणार आहेत यामुळे नागरिकांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे खासदार माने यांच्या 30 लाख 99 हजार 856 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 5 मधील नमाजगे मळा येथील ईदगाह मैदानावरील नमाज पठण ठिकाणी कॉंक्रिटीकरण करणे व फरशी घालून परिसराचे सुशोभीकरण करणे 18 लाख 99 हजार 956 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 5 मधील अब्दुलरशीद मुल्ला प्लॉट ते राहुल कुराडे प्लॉट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व जावेद नदाफ घर ते महंमद फरास घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटर्स करणे 21 लाख 99 हजार 868 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 6 मधील हुसेनशहा मोमीन घर ते हजरत नूरखान बादशाह दर्गाहपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व आरसीसी गटर्स बांधणे 14 लाख 99 हजार 991 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 3 मधील किरण शिंदे घर ते बाबासाहेब जगताप घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व अंडरग्राउंड गटर्स बांधणे सीडी वर्क करणे 14 लाख 99 हजार 994 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 4 मध्ये रामप्रसाद पाटील घर ते शिरोळ जयसिंगपूर रस्त्यापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व अंडरग्राउंड गटर्स बांधणे 12 लाख 99 हजार 950 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 4 मधील विवेक चुडमुंगे घर ते संभाजी पाटील घर व भरमू कोंडेकर घर ते विश्वास माने घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 14 लाख 99 हजार 992 मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 1 मधील बाळासो केंगारे घर ते बाळासो खडके घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 14 लाख 99 हजार 990 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 5 मधील जहांगीर सुतार घर ते दिनकर भाट घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 67 लाख 33 हजार 206 रुपये मंजूर निधीतून प्रभाग क्रमांक 1 मधील चर्मकार समाज स्मशानभूमी येथे निवारा शेड बांधणे या सर्व विकास कामांच उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या व स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला प्रत्येक ठिकाणी हलगीच्या कडकडाटात फटाक्याची आतिषबाजी करीत खासदार धैर्यशील माने यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले स्थानिक नागरिकांनी विकास कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल खासदार माने यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले .
यावेळी प्रशासक निशिकांत प्रचंडराव माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपाचे शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पूर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने शिवसेना युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राकेश खोंद्रे गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख भाजपा शहराध्यक्ष संभाजी भोसले युवा मोर्चा शिरोळ तालुकाध्यक्ष अनिकेत जगदाळे माजी नगरसेवक एन वाय जाधव माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब शेख भाजपाचे महेश देवताळे सुधीर शहापूरे नरेंद्र माने कॉन्ट्रॅक्टर सुनील माने विनीत माने गणेश चुडमुंगे अभियंता श्रीधर डुबोले टाकळीवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब वनकोरे यांच्यासह नागरिक भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा