शिरोळात उद्या दत्तनगर केंद्रस्तरीय इयत्ता चौथीची सराव प्रज्ञाशोध परीक्षा
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
स्वर्गीय पुष्पलता वसंत ढेकणे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मातोश्री चाईल्ड क्लिनिक व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तनगर केंद्रस्तरीय इयत्ता चौथीसाठी सराव प्रज्ञाशोध परीक्षा येथील राजश्री शाहू विद्यामंदिर शिरोळ नंबर १ येथे गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी. यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगातून सराव प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येत आहेत.गुरुवारी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रज्ञाशोध परीक्षा मातोश्री चाईल्ड क्लिनिक व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या माध्यमातून स्वर्गीय पुष्पलता वसंत ढेकणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राजश्री शाहू विद्या मंदिरात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येणार आहेत परीक्षेतील प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.शिरोळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे, शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी ३ वाजता बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
तरी इयत्ता चौथीच्या सराव प्रज्ञाशोध परीक्षेत दत्तनगर केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे,सेक्रेटरी तुकाराम पाटील(भैय्या),ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे, इव्हेंट चेअरमन विवेक फल्ले,मातोश्री चाईल्ड क्लिनिकचे प्रमुख डॉ.अतुल पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा