इचलकरंजी येथे पत्रकार व कुटुंबियासाठी शनिवारी आरोग्य तपासणी शिबीर : डॉ दगडू माने

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया कोल्हापूर जिल्हा शाखेमार्फत आयुष्यमान भारत कार्ड वाटप व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे . शनिवारी १६ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता इंचलकरंजी येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र नाकोडानगर येथे आरोग्य शिबीर होणार असून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे कोल्हापूर जिल्हा प्रवक्ते डॉ दगडू माने यांनी केले आहे.

          ते म्हणाले , व्हाईस ऑफ मीडियाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे संघटन चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून जनसेवार्थ प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सदृढ राहावे याकरिता इंचलकरंजी , शिरोळ ,कागल , हातकणंगले , करवीर यासह जिल्ह्यातील पत्रकारांच्या आरोग्य संपदेसाठी खास शिबिर होत आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर व मार्गदर्शक उपस्थितीत राहणार असून आवश्यकता वाटल्यास आरोग्य तपासणीनंतर योग्य तो उपचार व आरोग्य सुविधा देण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. तेव्हा इचलकरंजी येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरास पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ दगडू माने यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष