कनवाड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

        कनवाड - हसूर रस्त्यावर अज्ञात वाहनाने कनवाडहून हसूरकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. वाहनाचे चाक दुचाकीस्वार सागर संभाजी जाधव (वय २० रा. हसुर) याच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. या अपघाताची वर्दी उदय सुरेश जाधव यांनी शिरोळ पोलीसांत दिली. सागर जाधव हा मोटारसायकल हिरो स्प्लेंडर प्रो (एम एच ०९ बी जेड ०९५६) वरून कनवाडहून हसुरकडे येत होता. महेश कुपाडे यांच्या शेताजवळ पाठीमागून येणा अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

       या धडकेत सागर दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष