श्री लक्ष्मी दुध संस्था खणदाळ जिल्ह्यात प्रथम



सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

शेती व दुध व्यवसायावर अवलंबून असलेल खणदाळ गाव. चांगला व उत्कृष्ट दर्जाचे दुध पुरवठा करून कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघास सर्वाधिक दुध पुरवठादार म्हणून खणदाळ मधील श्री लक्ष्मी दुध संस्थेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.

गोकूळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर मार्फत ६१ वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते बक्षीसाचे प्रमाणपत्र व रोख बक्षीस स्विकारताना खणदाळ श्री लक्ष्मी दुध संस्थेचे चेअरमन संदीप घोडके, व्हा चेअरमन शिल्पा चौगुले, तसेच संचालक मल्लापा कोणूरी, नामदेव चिरमुरे, सचिन चिरमुरे, शिवानंद मगदूम, राजेंद्र पाटील, दीपा घोडके, सुनिल दावणे, तुकाराम परीट, आप्पासाहेब घस्ती व तज्ञ संचालक राजेंद्र जाधव, चनबसु चौगुले, शिवाजी पाटील उपस्थित होते.

तज्ञ संचालक राजेंद्र जाधव यांनी संस्थेमध्ये काम करणारे कामगारांचे, सर्व दुध उत्पादकांचे, सर्व सभासदांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

कारण माझ्या गावच्या लोकांनी आम्हांला त्यांची सेवा करण्याची संधी दिली व गावातील दुध उत्पादकांनी खुप मेहनत करून संस्थेमध्ये दुध घालतात त्यांना फायदा कसे होईल यावर आम्ही प्रामाणिक पणाने काम करत आहोत आणि पुढे राजेंद्र जाधव म्हणाले की लोकांची विश्वास संपादन करणे म्हणजे लोकांना स्वच्छ कारभार देणे होय.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष