विजेचा धक्का बसून ढोणेवाडीतील शाळकरी मुलाचा मृत्यू

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

      ढोणेवाडी तालुका निपाणी येथील कु ‌भद्रीनाथ प्रकाश सुर्यवंशी वय वर्षे १५ हा विद्यार्थी झाडावरील चिंचा काढण्यासाठी गेलेला असता विद्युत तारेचा स्पर्श बसून त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना रविवार दि.१७ रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे 

.याबाबत अधिक माहिती अशी की भद्रीनाथ सुर्यवंशी हा रविवार शाळेला सुट्टी असल्याने आपल्या मित्रा समवेत कारदगा ढोणेवाडी रस्त्यावरील सादळकर मळ्यात झाडावरील चिंचा काढण्यासाठी गेला होता. चिंचा काढत असताना झाडाच्या मधोमध गेलेली विद्युत तार दिसली नसल्याने त्या तारेला हाताचा स्पर्श होऊन जोराचा विजेचा धक्का बसला आणि तो खाली कोसळला मित्र व नातेवाईक यांनी तात्काळ कारदगा येथे खासगी दवाखान्यात दाखवून चिकोडीच्या शासकीय इस्पितळात दाखल केले .परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्या पश्चात आई-वडील ,दोन भाऊ असा परिवर आहे.

 तो ढोणेवाडी सरकारी हायस्कूल येथे इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता.एका गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्था मधुन हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष