शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा अभियान दिशादर्शक : आमदार डॉ. राजेंद पाटील यड्रावकर

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण, शाळेची असणारी भौगोलिक परिस्थिती,परिसराची स्वच्छता आणि यातून घडणारा गुणवत्ताधारक विद्यार्थी यासाठीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम दिशादर्शक ठरला आहे.यापुढेही जिल्हा परिषद शाळांच्या उन्नतीसाठी शासनाने नेहमीच कटिबद असेल.जिल्हा परिषद शाळांची भौगोलिक परिस्थिती, भौतिक सुविधा व साधनसंपत्ती सुधारण्यासाठी लागेल तेवढा निधी देऊन इंग्रजी माध्यमांच्या बरोबर जिल्हा परिषदेची शाळा बनवून शैक्षणिक विकास साधला जाईल.असे प्रतिपादन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. 

कृष्णा हॉल नांदणी (ता.शिरोळ) येथील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर २०२४ च्या पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी केले,त्या पुढे म्हणाल्या, अभियानात पुरस्कारासाठी काही निवडक शाळा जरी निवडल्या असल्या तरीही तालुक्यातील सर्वच माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळांनी २-३ महिन्यांमध्ये इतके उत्तुंग काम केले आहे.शाळांचे बाह्यांग, परिसर,भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता,शासकीय योजनांची अंमलबजावणी, अभिलेखे या सर्वच बाबतीत सर्व यंत्रणा,शाळा व्यवस्थापन समिती लोकप्रतिनिधी या सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने तालुक्यातील शाळांचे काम उत्कृष्ट झाले आहे.आमदार साहेबांनी ही शाळांसाठी भरघोस निधी दिलेला आहे.

पुरस्कार प्राप्त शाळा पुढीलप्रमाणे :

सरकारी शाळा (जिल्हा परिषद ) - प्रथम क्रमांक -जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुत्ती,द्वितीय क्रमांक -कुमार विद्या मंदिर टाकवडे, तृतीय क्रमांक -कुमार विद्या मंदिर कुरुंदवाड नं. ३

खाजगी शाळा : प्रथम क्रमांक -देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल , द्वितीय क्रमांक -ताराबाई आ.नरदे हायस्कूल नांदणी,तृतीय क्रमांक -चैतन्य पब्लिक स्कूल अ.लाट.


केंद्रस्तरावरील प्रथम क्रमांक - (सरकारी शाळा -जिल्हा परिषद)

उर्दू विद्यामंदिर उदगाव,विद्या मंदिर लाटवाडी,कन्या विद्या मंदिर हेरवाड केंद्रीय शाळा कन्या वि.मं.अकिवाट,कुमार वि.मं.दानोळी क्र.२, कुमार वि. मं.निमशिरगाव,कुमार वि.मं.टाकवडे,कुमार वि.मं. कुरुंदवाड नं.३,उर्दू वि.मं.अ. लाट,कुमार वि.मं.कुटवाड, जीवन शिक्षण वि.मं. धरणगुत्ती, केंद्र शाळा शेडशाळ, नगरपालिका उर्दू शाळा जयसिंगपूर.

केंद्रस्तर - प्रथम क्रमांक (खाजगी शाळा)

अँग्लो उर्दू हायस्कूल औरवाड, हेरवाड हायस्कूल हेरवाड, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल राजापूर, ताराबाई आ.नरंदे हायस्कूल नांदणी, आदर्श विद्यालय कोथळी, आचार्य आदिसागर हायस्कूल उदगाव,दत्त महाविद्यालय कुरुंदवाड,अल्लम्मा हायस्कूल कुरुंदवाड,हसूर हायस्कूल हसूर,चैतन्य पब्लिक स्कूल अ. लाट,पद्माराजे विद्यालय ज्युनियर कॉलेज शिरोळ, लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कवठेगुलंद,जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर.

   याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, शिक्षक बॅंकेचे संचालक सुनिल एडके,सुरेश पाटील,मनोज रणदिवे,शिवाजी ठोंबरे, राजाराम सुतार,केंद्रप्रमुख- दत्तात्रय जाधवर,रियाजअहमद चौगले,सलीम अत्तार,सुभाष कुरुंदवाडे, प्रकाश खोत,यशवंत पेठे,सुरेश कोळी,संदीप कांबळे,सुनिल कोळी,दिलीप शिरढोणे यांचे सह पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,प्राथमिक - माध्यमिक शिक्षक संघटना पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    अनिल सुतार यांनी गायलेल्या सुमधुर अशा भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  आभार शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही.पाटील यांनी मानले तर सूत्रसंचलन महेश घोटणे व किरण पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष