बंगळूरच्या राजीव गांधी विद्यापीठाकडून प्रिया संकपाळ यांना सुवर्णपदक

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

बंगळूर येथील राजीव गांधी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात आलेल्या फार्मसी परीक्षेत शिरोळ येथील कु प्रिया उदय संकपाळ ( शिलेदार ) यांनी सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन प्रिया संकपाळ यांचा गौरव करण्यात आला.

           येथील क्षारपड जमीन सुधारणा संस्थेचे उदय संकपाळ यांची कन्या प्रिया हिने २०२३-२४ मध्ये धारवाड येथील सोनिया एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी येथे एम. फार्मसीचे शिक्षण घेतले असून राज्यात सर्वाधिक गुण घेत तिने सुवर्णपदक मिळवले. आई -वडील यांच्यासह विद्यापीठाचे शिक्षक व कॉलेजचे स्टाफ मेंबर्स यांचे तिला मार्गदर्शन व सहकार्य लाभले. दरम्यान , या शैक्षणिक यशाबद्दल कु प्रिया हिचा विविध संस्था व संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष