श्री. बालाजी विद्यालयाचे गणित प्रज्ञा परीक्षेत घवघवीत यश

इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने २५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या इयत्ता ५ वी ते ८ वी च्या महाराष्ट्र राज्य श्रीनिवास रामानुजन गणित प्रज्ञा परीक्षेच्या निकालामध्ये श्री. बालाजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ५ वी च्या विद्याथ्यांनी गणित प्रज्ञा प्रमाणपत्रधारक म्हणून यश संपादन केले आहे.

या परीक्षेमध्ये अथर्व दिपक देशिंगे, विनय खंडोबा चव्हाण, आयुष संतोष पोवार, उत्कर्षा सौरभ कवडे, तन्वी अभिजित भागवत यांनी यश संपादन केले.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे गणित विभाग प्रमुख श्री. विनायक साळुंखे सर, शशीकांत जाधव सर, मानसी दळवी मॅडम, श्री. संतोष कोळी सर, व जाधव मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.एम.एस. रावळ मॅडम यांची प्रेरणा लाभली.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मदनराव कारंडेसाहेब, सेक्रेटरी मा. महेश कोळीकाल साहेब, मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. डी. वाय. नारायणकर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक / शिक्षकेतर वृंद गुणवंत विद्यार्थी व प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष