पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उद्या शिरोळ टॅलेंट सर्च परीक्षा : आमदार यड्रावकर यांची माहिती

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावे आणि यातून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडावा यासाठी शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिरोळ प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एस.टी.एस.उद्या सोमवार दि.११ मार्च २०२४ रोजी तालुक्यातील १३ केंद्रांवर इयत्ता पहिली ते तिसरी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची होणार आहे.पुढील वर्षी इयत्ता सहावी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार असल्याची घोषणा आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहे.

        सदर परीक्षेसाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.शिरोळ तालुका प्रज्ञा शोध परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तसेच परीक्षेचे संपूर्ण नियोजनासाठी शिरोळ तालुक्याच्या शिक्षण विभागासाठी शाळा इमारत बांधकाम,कंपाऊंड बांधकाम, शैक्षणिक साधनांच्यासाठी नेहमीच तत्पर असणारे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ग्रामीण भागातील बहुजनांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या बुध्दीमत्तेला चालना देण्याच्या हेतूने सदर परीक्षा होत आहे. पण सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होत नाही.हे ओळखून शिरोळ च्या कार्यतत्पर गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या संकल्पनेतून शिरोळ तालुका प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न होत आहे.सर्वसामान्य मुलांच्यातील गुणवत्ता शोधण्यासाठी या परीक्षेचे आयोजन केले आहे.     

       यासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर फौंडेशन,गट विकास अधिकारी शंकर कवितके,पंचायत समिती शिक्षण विभाग,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व कार्यालयीन स्टॉफ यांचे सहकार्य लाभत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष