चिकोडी लोकसभा साठी भाजप तर्फे अण्णासाहेब जोल्ले यांना दुसऱ्यांदा पुन्हा उमेदवारी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 लोकसभेच्या निवडणुकीसाठी काल भाजपने आपल्या 72. जागेसाठी दुसरी यादी जाहीर केली .यामध्ये कर्नाटक राज्यातील 28 जागांपैकी 20 जागांचे उमेदवारी जाहीर केले असून,यामध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री सह एका माजी मुख्यमंत्र्याचा समावेश केलेला आहे. चिकोडी लोकसभेसाठी भाजप तर्फे श्री अण्णासाहेब जोल्ले यांना भाजपचे उमेदवार म्हणून नावं घोषित केले आहे. 

   आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 28 जागा पैकी भाजपाच्या शिष्टमंडळाच्या वतीने 20 जागेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ,यामध्ये चीकोडीचे लोकप्रिय खासदार श्री अण्णासाहेब जोले यांची उमेदवारी घोषित केले आहे.या जागेसाठी माजी खासदार रमेश कत्ती व के एल ई .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कोरे यांचे चिरंजीव अमित कोरे यांच्याही नावाचा समावेश होता परंतु गेल्या पाच वर्षात श्री अण्णासाहेब जोले व कर्नाटकच्या माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलेल्या विकास कामामुळे भाजप नेते मंडळांनी चिकोडी लोकसभेसाठी अण्णासाहेब जोल्ले यांचेच नाव उमेदवारी म्हणून घोषित केले आहे. *. 2018 चां निवडणूक काळात दिलेली आश्वासने विशेष अनुदानातून पुर्ण करण्याचा जोल्ले नीं प्रयत्न केले आहेत. एकंदर केंद्र व राज्य सरकारच्या दरबारतून विकास कामासाठी खासदार अण्णासाहेब जोले यांनी आठ मतदारसंघात 800 शे कोटीहून अधिक विकास कामे केली आहेत यामध्ये उज्वल गॅस, पाणी, पाणंद रस्ते,घरकुल योजना, गटारी, राष्ट्रीय महामार्ग, मंदिरांचा जीर्णोद्धार अशी विविध कामे केली आहेत त्यामुळे केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा चिकोडी मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून अण्णासाहेब जोले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष