दानोळी शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांची वज्रमुठ

 


दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

     दानोळी ( ता.शिरोळ ) येथून जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक पार पडली.यावेळी शेतकरी एकजूट होऊन शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

     गावातील जवळपास १२५ गटातील शेतीमधून जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गामुळे शेतकरी भुमिहीन होणार आहे.कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग थांबविण्यासाठी दानोळी गावातील शेतकऱ्यांनी आज मंगळवारी लाक्षणिक उपोषण करुन शक्तीपीठ मार्गास विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी दानोळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी वज्रमुठ करुन शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली.

     यावेळी कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग थांबविण्यासाठी दानोळी गावातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण करुन शक्तीपीठ मार्गास विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.या महामार्गासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे परंतु होत असलेल्या या सर्वेक्षणाला दानोळी व परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे.प्रस्तावित महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ते एकत्र झाले असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून यांनी लढा सुरु केला आहे.शेतकर्यांनी शक्तीपीठ विरोध करत मंगळवार( दि.१२ ) रोजी सकाळी ९ वाजता लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.यावेळी महामार्गासाठी सुरु असणारा सर्व्हे तात्काळ बंद करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.या नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत.शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग गावापासून अवघ्या ४ कि.मी.वर असून हा शक्तीपीठ महामार्ग कशाला असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

    शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी बचाव कृती समितीच्या अध्यक्षपदी संजय परमाप्पा यांची तर उपाध्यक्षपदी अशोक आनंदा यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, रामचंद्र शिंदे,मानाजीराव भोसले,गुंडूनाना दळवी, धनपाल परमाप्पा,केशव हरिबा राऊत,शंकर पिसे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष