प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता गोविंदाने शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये केला प्रवेश

 


मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता गोविंदाने शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गोविंदाने शिंदेची भेट घेतली होती. तेव्हापासूनच गोविंदाच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर आधी बैठक झाली त्यानंतर काही वेळातच गोविंदाचा पक्ष प्रवेश झाला.

आपली इंडस्ट्री मोठी आहे. कलाकारांसह बॅक स्टेजलाही काम करणारे लोक आहेत मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. कोणत्याही अटी शर्तीविना गोविंदा प्रवेश करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. सगळीकडेचं गोविंदा गोविंदा आहे. कोरोना काळात सर्व सण उत्सव बंद होते. ही बंदी उठवताना पहिला सण हा गोविंदाचा होता हा योगायोग असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीमध्ये गोविंदा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पाहणार आहे. त्यासोबतच चित्रपटसृष्टी आणि सरकारमधील तो दुवा असणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष