शिक्षणाची गुणवत्ता व इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यात डॉ. राजेंद्र पाटील सोशल फौंडेशन प्रयत्न करणार -संजय पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
मुलांची गुणवत्ता जर अशा पध्दतीने वाढणार असेल आणि त्यांना चांगले शिक्षण देण्याचे काम आपण जर करणार असाल तर निश्चितपणे आमचे नेते आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून राजकारण विरहित अनेक सामाजिक कार्य करीत असतो. त्याच अनुषंगाने या प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन केले आहे. असे प्रतिपादन संजय पाटील यड्रावकर यांनी केले. शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,तालुक्यातील १०,३०० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.निश्चितपणे आपल्याकडे मुले चांगल्या पद्धतीने शिकत आहे.३०ते ४० विद्यार्थी टॉप टेनमध्ये येतील अशी अपेक्षा होती पण जवळपास ३००ते ४०० विद्यार्थी निघाले.मुलांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.आणि आपण या मुलांना चांगल्या पध्दतीने शिकविण्याचे काम करीत आहात.
चिपरी केंद्रांवर भेट दिली असता असे दिसून आले की काही मुलांना बेंच नव्हते.या सुविधा देण्यासाठी प्रयत्न निश्चितच केले जातील.सरकारी शाळेतील मुलांना सुध्दा चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले पाहिजे.आपल्यासाठी गुणवत्ता चांगली आहे शिक्षक चांगले शिकवतात.पण फॅसिलिटी नसलेने पालकांचा ओढा केवळ देखाव्यामुळे प्रायव्हेटकडे जास्त आहे.चांगले शिक्षण हे गर्व्हमेंट शाळेत दिले जाते.यासाठी आपण शिक्षक मंडळी खूप मोठे योगदान देत आहात.
येणाऱ्या काळात तालुक्यातील एकही विद्यार्थी खाली बसून शिकणार नाही.एवढे वचन मी यावेळी देतो.५ मे या आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या वाढदिनी जितके बेंच लागतील तितके बेंच पोहोच केले जातील.
दिल्ली शिक्षण पॅटर्न पध्दती नुसार जयसिंगपूर शहरात डिजीटायझेशन पध्दतीने राबवित आहे.मुलांच्याकडे आयपॅडच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.मुलगा आजारी पडला तरी त्याचे शिक्षण बुडणार नाही त्याचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.यासाठी आयपॅडमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
तसेच शिरोळ तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एक शाळा निवडून त्या ही डिजीटायझेशन करण्यात येतील.किंबहुना आधुनिकपणे शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्वच शाळा डिजीटायझेशन केल्या जातील.
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात खूप मोठी विकासकामे झाली आहेत. तालुक्यात हॉस्पीटल आणि शिक्षणांवर जास्त भर दिलेला आहे. ४०ते ६०बेडस असणाऱ्या ठिकाणी ६००ते ९०० बेडस उपलब्ध करुन दिले आहेत.येथून पुढच्या काळामध्ये शिक्षणांवर जास्त भर देवून काम करणार असल्याचे स्पष्ट केले.आजच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी,पालक व मार्गदर्शकांचे अभिनंदन करतो.
प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी केले त्या म्हणाल्या की,उडत्या पक्षाला परतीची तमा नसावी. घरट्याचं काय कधीही बांधता येतं पण क्षितीजा पलिकडची झेप घेण्याची जिद्द मनांमध्ये असावी.ही झेप 'शिरोळ तालुका प्रज्ञाशोध' या परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. झेप घेण्याची संधी विद्यार्थ्यांना शिरोळ तालुक्यात आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून संजय पाटील यड्रावकर यांनी उपलब्ध करून दिली.
दैनंदिन सर्व उपक्रम शाळांत राबविले जातात. पण अशा पद्धतीने मुलांच्या मध्ये काय क्रीम आहे हे शोधणे आणि काय कमी आहे? हे शोधण्याची संधी यड्रावकर साहेबांनी परीक्षेच्या आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.परीक्षेचा व बक्षिसांचा सर्व खर्च डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून उचलला आहे.वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रांताधिकाऱ्यांनी भेट देवून पहिली दुसरीच्या मुलींचे वाचन पाहून थक्क झाल्या होत्या.शिरोळ तालुक्याची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची आहे.आजच्या पालकांना पाल्याच्या भवितव्या विषयी खूप काळजी आहे.परीक्षेसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी आपण तयारीत राहिले पाहिजे जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांचा मान -सन्मान समाजात टिकून राहिला पाहिजे.
आज पालकांचा ओढा खाजगी शाळांकडे आहे पण विविध परीक्षांचा निकाल पाहिला तर जिल्हा परिषदांच्या शाळांत शिकलेल्या मुलांचेच यश दिसून येत आहे. जवळपास ३००ते ४०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून कौतुक करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनचे अजित उपाध्ये, राहूल बंडगर,राजीव मालू,चेतन चौधरी, परीक्षा विभागप्रमुख अनिल ओमासे, शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत, एन.व्ही.पाटील,केंद्र प्रमुख दत्तात्रय जाधवर,अण्णा मुंडे, सलीम अत्तार,सुभाष कुरुंदवाडे, यशवंत पेठे,विजय भोसले,सुरेश पाटील,मनोज रणदिवे,राजाराम सुतार,दिलीप पाटील,दिलीप शिरढोणे यांचेसह यशस्वी विद्यार्थी,पालक,मार्गदर्शक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वागत गीत अनिल सुतार यांनी सादर केले.आभार शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही. पाटील यांनी मानले तर सूत्रसंचलन किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा