जमीन आरक्षण संदर्भात दिशा ठरविण्यासाठी उद्या शिरोळात बैठक : पृथ्वीराजसिंह यादव

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ नगर परिषदेकडून टाकण्यात आलेल्या जमीन आरक्षण संदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी कल्लेश्वर मंदिर, शिरोळ येथे रविवारी 17 मार्च,रोजी सायं. 6 वा. कल्लेश्वर मंदिर, शिरोळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे.

शिरोळ नगरपरिषदेकडून काही दिवसापूर्वी विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर शहर व शहरालगतच्या ठराविक जमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याची जाहीर प्रसिद्धी केली आहे. या आरक्षण प्रसिद्धीमध्ये शहरातील अनेक, गोरगरिब, अल्पभूधारकांच्या जमिनी जागा गुंतवण्यात आल्या आहेत. जमीन,आरक्षणामुळे नागरिक, शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जमीन आरक्षणाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. य आरक्षणाचा लढा कसा व कोणत्या पद्धतीने द्यायचा ? या बैठकीत यासंदर्भात विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे . या बैठकीमध्ये ज्या -ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडले आहे, अशा शेतकऱ्यांच्या विचाराने, विनिमयाने पुढील मार्ग अवलंबला जाणार आहे. 

 तरी,जमीनआरक्षणात पीडित झालेल्या सर्व शेतकरी, नागरिक, बांधवांनी रविवार दिनांक 17 मार्च 2023 या रोजी सायं. 6 वा. कल्लेश्वर मंदिर शिरोळ, सांस्कृतिक हॉल येथे उपस्थित रहावे. असे आवाहन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष