ढोणेवाडी प्राथमिक शाळेत सुरू आहे सावळा गोंधळ ? पालक चिंतेत
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी तालुक्यातील ढोनेवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेत सावळा गोंधळ सुरू असल्याने पालकांच्या मध्ये मात्र चिंतेचे वातावरण सुरू आहे.याकडे शिक्षण खाते लक्ष देणार कि बघ्याची भूमिका घेणार असा सवाल पालकांच्या मधुन व्यक्त केला जात आहे.
ढोणेवाडी सरकारी मराठी शाळेतील शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कांहीं दिवसापूर्वी एका निष्पाप शाळकरी मुलीला जीव गमावण्याची वेळ आली होती. एवढे मोठे गंभीर प्रकरण होवुन देखील अद्याप त्या ठिकाणी मुलामुलींच्या साठी शौचालय व मुतारी बांधण्यात आली नाही. केवळ आश्वासन देवुन दोन वर्षे उलटली आहे.आजही तिथे सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्या मोडकळीस आलेल्या जुन्याच शौचालयाचा आसरा विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो आहे.मराठी शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक नाही तात्पुरता भार हंगामी शिक्षकांना देवुन शाळेच्या कामकाजाची एक प्रकारे थट्टाच चालवली जात आहे.शाळा सुधारणा समितीची रचना नसल्याने कोणतेही वचक शिक्षकांच्या वर नाही .त्यामुळे अनेक गैर कारभाराला खतपाणी घातले जात आहे. मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्की ,अंडी वाटपातही अनियमित पणा मध्यंतरी झाला होता पंच कमिटी व पालकांनी संबंधितांना झापल्यावर नियमित पणे आहार दिला जात आहे.एका शिक्षकांकडून तर मुलीना शिक्षा म्हणून माराहण करून गैरवर्तन
केल्याची चर्चा आहे. शिक्षक ही वेळेत हजर राहत नसल्याच्या तक्रारी आहेत .शैक्षणिक वर्ष संपत आले तरीहि या मध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही.शाळेत विविध उपक्रम राबवुन आटापिटा करणाऱ्या शाळा प्रशासनाचा मात्र दिव्या खाली अंधार राहिला आहे. पालकांच्या विश्वासाला तडा लावुन काही शिक्षक विद्या दानातही दुजा भाव करून शाळेत राजकारणही चालवले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. चूका करुनही तो मी नव्हेच असा काहीनी पवित्रा घेतला आहे.त्यामुळे मराठी शाळेतील हा सावळा गोंधळ संपणार कधी असा सवाल पालकांच्या मधून व्यक्त केला जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा