कर्मवीर मल्टिस्टेट जयसिंगपूर संस्थेच्या शिरढोण शाखेचा शुभारंभ
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शिरढोण शाखेचा शुभारंभ संस्थेचे संचालक मा.श्री कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते आणि महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशनचे संचालक व कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेचे चेअरमन मा. श्री सागर चौगुले यांचे अध्यक्षतेखाली आणि दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार मा.श्री अरविंदजी मजलेकर, उपाध्यक्ष मा.श्री भूपाल गिरमल, संचालक मा.श्री भरत गाट व वीर सेवा दलाचे सह कार्यवाह मा.श्री.अभय पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संप्पन्न झाला. यावेळी चेअरमन म्हणाले आज कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेने ग्राहकांना कोणतेही अमिष न दाखविता 1000 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. थोर शिक्षणमहर्षि कर्मवीर आण्णांच्या विचाराने चालवली जाणारी ही संस्था असल्याने ग्राहक व कर्जदार यांचे हित जोपासले आहे. भांडवल पर्याप्तता 16% असलेने संस्था अत्यंत मजबूत अशा स्वभांडवलावर उभी आहे. संस्थेकडे असलेल्या आकर्षक व्याजाच्या ठेव योजना व अत्यल्प व्याज दराच्या सुलभ कर्ज योजनांचा लाभ शिरढोण परीसरातील सभासद व ग्राहकांनी घ्यावा असे अवाहन त्यांनी केले.
संस्थेचे संचलन करणारे संचालक मंडळ निस्वार्थ व सामाजिक भावनेने कार्य करत रयतेला आर्थिकदृष्टया साक्षर व सक्षम बनवत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेस उपयोगी होईल याचा विचार करुनच ठेव व कर्जाच्या विविध योजना संस्थेने आणल्या आहेत याचा लाभ शिरढोण वासीयांनी घ्यावे असे मनोगत प्रमुख अतिथी भरत गाट यांनी व्यक्त केले. तर उद्घाटक श्री कुमार पाटील म्हणाले की शिरढोण गावातील बरेच सभासद शेजारील कुरुंदवाड शाखेत व्यवहारासाठी येतात पण महिला ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार करणे सोयीचे व्हावे यासाठीच ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिरढोण गावात शाखा सुरु केली आहे. संस्थेकडे महिलांसाठी असलेल्या सुवर्ण अभूषण कर्ज योजनेचा लाभ त्यांना निश्चितच होणार आहे. तसेच यावेळी संचालक श्री आदिनाथ किणींगे, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष भूपाल गिरमल, यांनी मनोगते व्यक्त केले.
या सोहळ्यासाठी उपस्थितांचे स्वागत व्हा.चेअरमन सुभाष मगदूम यांनी केले. यावेळी शिरढोणचे सरपंच मा.बाबासो हेरवाडे, उपसरपंच सौ.रेश्मा चौधरी, जैनंमदिर ट्रस्टचे अध्यक्ष कल्लाप्पा कोईक, शाहिद बाणदार, माधूरी चौगुले, इंजिनिअर राजू हुल्ले, श्री बालिघाटे यांचे सह शिरढोण परिसरातील सभासद, ग्राहक, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक, सुकुमार पाटील, अनिल भोकरे, रमेश पाटील, भाऊसो पाटील, रावसोा पाटील, प्रा.आप्पा भगाटे, अमोल पाटील, अनिल गडकरी, पंकज ऐवाळे, सौ. उर्मिला मनोहर उपाध्ये, सल्लागार संजय मालगावे, पार्श्वनाथ पाटील, निलेश पाटील आदि उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार संचालक राजेंद्रकुमार नांदणे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा