ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा व भव्य यात्रा
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे दानवाड सालाबादप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा व यात्रा भरणार असुन सोमवार दि,२२/४/२०२४ ते रविवार दि,२८/४/२०२४ अखेर भरणार आहे. सोमवारी दिनांक 22/4/ 2024 रोजी सकाळी सात वाजता ध्वज पूजन व सायंकाळी सात वाजता मंदिर सजावट कार्यक्रम रात्री नऊ वाजता संगीत भजन माणिक मलिकवाडे व त्यांचे सहकारी, यात्रेचा मुख्य दिवस मंगळवारी 23/ 4 /2024 रोजी पहाटे पाच वाजता पालखी सोहळा व सामूहिक दंडवत, सकाळी सात वाजता जन्म काळ सोहळा,व पुष्पवृष्टी, सकाळी आठ वाजता पालखी नगर प्रदक्षिणा सायंकाळी सहा वाजता महानैवद, रात्री नऊ वाजता आतिशबाजी, बुधवारी दिनांक 24/ 4/ 2024 रोजी हातात बैल धरून पळविणे प्रथम क्रमांक तीन फुटी सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक दोन फुटी सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक एक फुटी सन्मानचिन्ह, गुरुवार दिनांक 25 /4/ 2024 रोजी भव्य श्वान स्पर्धा प्रथम क्रमांक 26 इंची चांदीची गदा, द्वितीय क्रमांक 25 इंची चांदीची गदा, तृतीय क्रमांक 24 इंची चांदीची गदा, व क्रमांक चार ते दहा पर्यंत येणाऱ्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात येईल, दिनांक 26 4 2024 रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद शनिवारी दिनांक 27 /4/ 2024 रोजी सायंकाळी चार वाजता भव्य निकाली कुस्ती मैदान रविवारी दिनांक 28/ 4/ 2024 रोजी सायंकाळी चार वाजता श्री भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यानमालयाचे कार्यक्रम आयोजित केले आहे,तसेच खेळणी व स्टॉल,पाळणे मेवा मिठाई यांची जेवणाची व्यवस्था यात्रा कमिटीकडून केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा