नवे दानवाडचे सरपंच डॉ.सी.डी.पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
डॉ .सी.डी.पाटील यांनी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक माणसे जोडली आहेत त्यामुळे नवे दानवडचे लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यातून गावाचा विकासाचा आलेख उंचावला आहे.याचेच औचित्य साधून अलमप्रभू योगपीठ आळते या संस्थेने पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. सदरचा पुरस्कार हा 19वा लिंगायत गण मेळावा अलमप्रभू योगपीठ आळते येथे कुडल संगम च्या पिठाध्यक्षा गंगा माताजी व आलमगिरी योगपीठ चे पीठाधीश बसवकुमार स्वामीजी त्यांच्या अमृत हस्ते महात्मा बसवेश्वर यांचे मूर्ती,शाल, मानपत्र, शिल्ड, देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी भालचंद्र कागले माजी सभापती पंचायत समिती शिरोळ, अण्णासाहेब पाटील,किणिकर सर व पाटील यांचे मित्रपरिवार उपस्थित होते.यावेळी बसवपिठावर अनमिशानंद स्वामीजी, प्रभूलिंग स्वामीजी, ज्ञानेश्वर माताजी, दानेश्वरी माताजी यांची प्रमुख उपस्थिती होते. डॉ.पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा