शमनेवाडी येथे जातीय दंगलीत २० जणांच्यावर सदलगा पोलिसांत फिर्याद दाखल

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :


             शमनेवाडी ता.चिक्कोडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी क्षुल्लक कारणावरून दोन जातीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन रात्रभर दलित महिला व कार्यकर्त्यानी सदलगा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता . रात्री २.३० वाजता सदलगा पोलिस ठाण्यामध्ये फ़िर्याद दाखल करण्यात आली असून सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहकारी तसेच चिक्कोडी व इतर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रात्रभर बंदोबस्त ठेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.15 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक भिमाशंकर यांनी सदलगा येथे भेट देत या घटनेबद्दल सविस्तर माहिती घेतली व दोनही समाजातील नेत्यांशी चर्चा करून शमनेवाडी येथे शांतीसभा घेण्याचा निर्णय घेतला. 

                  पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की शमनेवाडी येथे ता.१४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्रातील माणगांव येथून कार्यकर्त्यांनी भीम ज्योत आणली होती. शमनेवाडी बसस्थानका जवळ ज्योत आल्यानंतर फटाके उडवितेवेळी तणाव निर्माण झाला. तो शांतही करण्यात आला, पण सायंकाळी पुन्हा वाद निर्माण होऊन दंगलीत रूपांतर झाले.त्यामुळे दलितांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी शमनेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष मंजुनाथ सुरेश कांबळे यांनी सदलगा पोलिस ठाण्याशी संपर्क साधत रात्री २.३० च्या दरम्यान २० जणांच्या विरुद्ध मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. यावेळी गावातील दलीत समाजातील महिला व युवकांनी सदलगा पोलिस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या मांडला होता. सदलगा व जवळपासच्या पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष