मतदार महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य देतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()  | 
| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, डॉ. अशोकराव माने, मिलिंद भिडे, रामचंद्र डांगे, डॉ. नीता माने आदी. | 
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकसंघ राहून महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य देतील. शिरोळ तालुक्याच्या बाबतीत चिंता नसावी असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.१३) कोल्हापूर येथील बैठकीत दिला.
गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून त्यांना शिरोळ तालुक्यातील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना शिरोळ तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळायला हवे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने धैर्यशील माने यांचा विजय अपेक्षित आहे.
शिवसेना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रचारात सक्रिय व्हावे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे क्रांती करणाऱ्या शिरोळ तालुक्यातून यावेळी धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य मिळावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
माधवराव घाटगे म्हणाले, भाजपा आणि शिवसेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात गाववार प्रचाराचे नियोजन करून धैर्यशील माने यांना मोठे पाठबळ देण्याचा प्रयत्न करू. शिक्षण मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळातदेखील विकासाच्या रचनात्मक कार्यातून भाजपाला वेगळे वलय निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करणार आहोत. धैर्यशील माने यांना तालुक्यातून अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, शिरोळचे माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने, रामचंद्र डांगे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने, भाजपा जयसिंगपूर मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा