लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले लोकसभा निवडणुकीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा असल्याची घोषणा पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. गिरीश फोंडे यांनी केली आहे.
हातकणंगले मतदार संघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. ज्या पक्षाच्या नेतृत्वाच्या नावावर त्यांनी मते मागितलीत त्यांचा त्यांनी विश्वासघात केला. यामुळे जनतेतून त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांनी मतदार संघातील जनतेच्या विकासाऐवजी स्वतःच्या विकासावरच जास्त भर दिला. त्यामुळे आमचा पक्ष आणि सर्व जन संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा देत आहोत. राज्यामधील शेतकरी आणि कष्टकऱ्यांची चळवळ टिकायची असल्यास भाजपला पराभूत करून राजू शेट्टींना निवडून देऊ, अशी ग्वाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
.webp)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा