बोरगाव येथे भाजपच्या प्रचारार्थ पुत्र बसवप्रसाद जोल्लेनी घेतली आघाडी.

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

     निपाणी तालुक्यातील बोरगांव येथील विविध वॉर्डांत बसव ज्योती युथ फौंडेशन चे अध्यक्ष श्री बसवप्रसाद जोल्ले यांनी प्रत्येक्ष कार्यकर्ते चां घरी जाऊन निवडणुकी बद्दल विचारपूस केली.

        भेटी दरम्यान बसव प्रसाद म्हणाले की आमचे वडील चिकोडी चे खासदार श्री आण्णासाहेब जोल्ले यांनी रस्ते, जलजीवन मिशन, मंदिरांचा विकास, उज्वला गॅस,पी एम विकास योजना, आयुष्य मान भारत आरोग्य योजना,यासारख्या योजनांतून ८८१० कोटींची विकासकामे केली आहेत. मतदारसंघाचा विकास पुन्हा एकदा पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयासाठी मतदान करावे. आज पुन्हा एकदा देशाला पंतप्रधान मोदी यांची नितांत गरज असून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी श्री आण्णासाहेब जोल्ले यांनाच मतदान करावे असे आवाहन बसवज्योती युथ फौंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले.

     यावेळी बोरगांव चे युवा नेते,नगरसेवक, हलासिद्दनाथ साखर कारखाना चे संचालक श्री शरद जंगठे म्हणाले की निपाणी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध विकास कामे आणून भागाचा कायापालट केला आहे. सर्व सामान्य जनतेला विश्वासात घेऊन सावित्रीच्या लेकी चे सबलीकरण केले आहेत.त्याकारण येणाऱ्या काळात जोललेंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.

      श्री बसव प्रसाद जोले यांनी बोरगांव शहरातील भाजप कार्य कर्ते समवेत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. यावेळी नगर सेवक शरद जंगठे ,जितु पाटील,रमेश पाटील,अजित तेरदाळे,राजू पाटील, विष्णु तोडकर, बाबसाब चौगुले, शिवाजी भोरे,जिंनु अंमनावर,राणी बेविन कट्टी,अमित माळी, अजित कांबळे, महावीर पाटील, बाळासाब उरणकर, शिवाजी कदम,अयुब मोमीन, फिरोज अफराज,जमील अत्तार,शंतू पत्रवळे, ईलाई कापसे,शीतल पाटील, संतोष पाटील यांच्या सह भाजप कार्य कर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.                

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष