दलित पॅंथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा खासदार माने यांना जाहीर पाठिंबा
हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :
आज माहितीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे कार्यकर्त्यांना धावती भेट देत असताना अचानकच दलित पँथर सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम भोसले व त्यांचे सहकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त जाहीर पाठिंबा जाहीर केला.
यावेळी दलित पँथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम भोसले, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रमोद लोखंडे, शिव उद्योग सहकार सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा. हर्षद निधीहाळ, शिव उद्योग सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष गणेश चोथे, संघटक सदानंद कडलक, रोहित कांबळे, जयेश ओसवाल, गौतम इनामदार, महाराष्ट्र सैनिक आघाडी प्रवक्ता चंद्रहार पाटील उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा