ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूने तो नक्की विजय होणार : विनय कोरे
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली होती.
सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खरं आहे, कारण मला राज्यसभेवर पाठवायच श्रेय त्यांचच आहे. असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, शाहू महाराजांचे वय झालेल असताना त्यांना लोकसभेला उभ केलय, मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही? असा सवाल त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहत राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केल.
ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वराच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे. असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय रावजी कोरे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून 85% मतदान धैर्यशील दादा तुम्हाला मिळवून देऊ असं अभिवचन दिले. 'जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला गुलाल पडतो' या इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी ग्वाही विनायरावजी कोरे यांनी दिली. त्याचबरोबर राष्ट्रधर्म व राष्ट्रनिर्मिती जपण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन विनय रावजी कोरे यांनी केले.
यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनायरावजी कोरे, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक, शेतकरी संघांचे संचालक प्रधान पाटील सर, संताजी बाबा घोरपडे, मा. जि प सदस्य शिवाजीराव मोरे, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, दगडू पाटील, प्रकाश पाटील आण्णा, सरपंच दिपाली पाटील, बाबासाहेब शिंदे सर, बी के जाधव, विकास पाटील, जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हासचिव संदीप पाटील, लालासो पवार व विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते हजारो च्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा