स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार प्रतिज्ञा बाबत आढावा बैठक संपन्न
जिल्हा स्वीप कार्यक्रम प्रमुख एकनाथ आंबोकर यांची उपस्थिती
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारामध्ये जनजागृती करणे व मतदानाचा टक्का वाढविणे याकरिता जिल्हा,तालुका व शाळा स्तरावर विविध उपक्रम आयोजिले जात आहेत.
निवडणुकीमध्ये मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही शासन प्रणाली बळकट करण्यासाठी व राज्यघटनेने दिलेला मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. भारतीय निवडणूक आयोगाचा मतदार साक्षरता,मतदार शिक्षण व मतदार जागृती हा बहु-हस्तक्षेप कार्यक्रम आहे.यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत स्वीप कार्य क्रमात सहभागी होवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यात हातभार लावावा.१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आयोजित Pledge for Vote, I Vote For Kolhapur या ऑनलाईन मतदार प्रतिज्ञा उपक्रमाबाबत जनजागृती करुन जनतेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.ते शिरोळ पंचायत समितीमध्ये आयोजित कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी शिरोळ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुवर्णा बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर,गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांचे सह विविध विभागाचे खातेप्रमुख,विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान पंचायत समितीच्या शिक्षण विभागास सदिच्छा भेट देवून अभिलेखे वर्गीकरण,नूतन केबिन व कामकाजा संदर्भात माहिती घेवून मार्गदर्शन केले. शिक्षण विभागाच्या कामकाजा संदर्भात समाधान व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा